अणे, माधव श्रीहरी (लोकनायक बापूजी अणे)

विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक जीवनातील एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे. ह्यांचा जन्म २९ ऑगस्ट १८८० साली झाला. त्यांच्या घराण्याचे मूळ नाव वणी. त्यांचे आजोबा हे वैदिकी होते. त्याचे लहानपणापासूनच संस्कार अणे यांच्यावर झाले. […]