अजय सरपोतदार

मराठी चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक

टाटा मोटर्स या नामांकित कंपनीसाठी सरपोतदार यांनी अनेक जाहिराती आणि माहितीपट (डॉक्युयमेंटरी) तयार केले. अजय सरपोतदार यांनी आपल्या विविधांगी कारकिर्दीत हैदराबाद येथील जगप्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीत अनेक वर्ष वरिष्ठ निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली.

मराठीबरोबरच प्रादेशिक वाहिन्यांचे काम त्यांच्याकडे देण्यात आले होते. आपले वडिल विश्वा स सरपोतदार आणि आजोबा नानासाहेब सरपोतदार यांच्या पावलावर पाऊल टाकत चित्रपट क्षेत्रात काम करू लागलेले अजय सरपोतदार १९९५ मध्ये “पैंजण’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरले.

आजोबा नानासाहेब सरपोतदार यांनी १९१९ साली स्थापन केलेल्या आर्यन फिल्म कंपनीचे त्यांनी पुनरूज्जीवन केले. या कंपनीच्या बॅनरखाली सरपोतदार यांनी अलिकडेच कोटींचे बजेट असलेल्या उलाढाल या चित्रपटाची निर्मिती केली होती. बॉलिवूडमधील चित्रपटांच्या तोडीसतोड असे तांत्रिक पाठबळ वापरून हा चित्रपट तयार करण्यात आला होता. त्याचे चित्रिकरण मॉरिशसमध्ये करण्यात आले.

अजय सरपोतदार यांनी मॉरिशसमध्ये झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाचे यशस्वीरित्या आयोजन केले.

अजय सरपोतदार यांच्यावरील संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

# Sarpotdar, Ajay

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*