मराठी आडनावं – माअी

Marathi Surnames - Maai

काही मराठी आडनावं अशी आहेत की ती आडनावं आहेत यावर विश्वासच बसत नाही. काही व्यक्तीनावंही आडनावं असतात. वसंत, दशरथ, मनोहर वगैरे. माअी हे आदरयुक्त स्त्रीलिंगी टोपण नाव आहे. या नावाचीच ही नवलकथा …..

माझे काका 90 वर्षांचे आहेत. (1976 साल). सलूनमध्ये जाअून केस कापून घेणं ही अलीकडची पध्दत. पूर्वी न्हावी घरी यायचा आणि ज्यांचे केस वाढले असतील त्यांची हजामत करून द्यायचा. अशाच अेका प्रसंगी घडलेली गंमत काका सांगतात.

त्यावेळी कुटुंब मोठं असायचं. लहान मुलं, मोठी माणसंही बरीच असयची. शिवाय चाळीतल्या किंवा वाड्यातल्या बिर्‍हाडातील बरीच मंडळी असायची त्यामुळे न्हाव्याची अेका ठिकाणी बरीच कमाअी होत असे.

अेकदा अेका रविवारी, काका त्यांच्या मित्राकडे गेले होते. मित्राचे केस कापून घेणं चाललं होतं. काकांचे केसही वाढले होते.

ते म्हणाले .. चला मीही येथेच माझे केस कापून घेतो.

मित्र म्हणाला … घ्या ना. पण आधी शेजारच्या माअींचे केस कापायचे आहेत. त्यांचं झालं की तुम्ही बसा.

केस कापून घ्यायला माअी येत आहेत हे अैकून काकांना आश्चर्य वाटलं. त्याकाळी विधवांचं केशवपन केलं जाअी. पण ते अेखाद्या आड बाजूच्या खोलीत. माअी ही विधवा बाअी, सर्वांसमोर केस कापून घेणार हे अैकून काका चाटच पडले.

मध्यंतरी अेक गृहस्थ आले आणि केस कापून घेअू लागले. तो पर्यंत काका वर्तमानपत्र वाचीत बसले.

थोडा वेळ गेला. काकांचे मित्र आघोळ करून आले. त्या गृहस्थाचे केसही कापून झाले होते. मित्र म्हणाला … वामनाचार्य, आता तुम्ही बसा.

पण त्या माअींचं व्हायचं आहे ना ? काकांची शंका.

अहो हेच माअी. आमचे नवे शेजारी.

— गजानन वामनाचार्य
अमृत : अेप्रिल 1976

4 Comments on मराठी आडनावं – माअी

  1. नमस्कार.
    आपले लेख मी वाचत असतो. माहितीपूर्ण व interesting असतात.
    आपण जसें ‘माई’ आटनांव दिलेलें आहे, तशाच एक अन्य आडनांवाचा आमचा अनुभव.
    – आमचे एक होमिओपॅथी-डॉक्टर बंगाली होते. नंतर कळलें की त्यांचे कंपाउंडर माहाराष्ठ्रीय होते. त्यांना ‘काका’ म्हणत. waiting time मध्ये त्यांच्याशी बोलणें होत असे. एकदा माझ्या पत्नीनें त्यांना विचारलें , ‘तुमचें आटनांव काय हो ?’ ते कांहीं काळ थांबले, व मग म्हणाले, ‘माझें आटनांव ‘अहो’.
    हें आडनांव आम्ही त्यावेळी एकदाच ऐकलेलें आहे, आधीही नाहीं, नंतरही नाहीं.
    – आपल्याकडील यादीत हें आडनांव आहे काय ?
    – ‘अहो’ हें आडनांव कुठून आलें असावें ? बायका नवर्‍याला ‘अहो’ अशी हाक मारतात, तो अर्थ इथें अभिप्रेत नसणार, हें उघड आहे.
    – संस्कृतमध्ये ‘अहन्’ म्हणजे ‘दिवसाचा उजेडाचा भाग’ , उदा. अहर्निश, अहोरात्र . ( अहो हें अहन् या शब्दाचेंच रूप आहे. ). त्याचा या आडनांवाशी कांहीं संबंध असेल काय ?
    -सुभाष स. नाईक

  2. होनाळे आडनाव बद्दल माहिती मिळू शकेल काय?

    शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी 800 होन सुवर्ण मुद्रा उधळण्यात आल्या, असे म्हणतात. त्या होन सुवर्ण मुद्रेचा होनाळे अडनावशी काही समंध आहे काय?

    • अंकुश या आडनावाची माहिती/इतिहास कळू शकेल काय

Leave a Reply

Your email address will not be published.


*