संतोष करमाळकर (Santosh R. Karmalkar)

 || श्री ||

शुक्रवार – ०९/१०/२०१०

प्रिय,

पोस्टमन काका,

सा.न.वि.वि. पत्रास कारण की,

बरेच दिवस झाले तू एकही पत्र घेऊन आमच्या घरी आलाच नाही, इकडे सर्वजण तुझी आतुरतेने वाट पहात आहेत, अजूनही आठवते मला तू तुझ्या सायकल वर ढांग टाकून घरा जवळ येताच तुझ्या सायकल ची ” ट्रिइंग ट्रिइंग अशी बेल वाजवायचास , कधी सुखाचे तर कधी दुःखाचे क्षण घेऊन यायचास,

तू ऊन, पाऊस, वारा, वातावरण कसेही असो स्वतःच्या आरोग्याची चिंता न करता तुझे काम तू जवाबदारी ने पार पडायचास,

मला आजही आठवतेय तू एक पत्र घेऊन आला होतास,मी खूप लहान होतो तू गडबडीत आम्हाला आलेले ते पत्र माझ्या हातात दिलेस अन घरात जाऊन मोठ्याना दे म्हणालास, मला त्यावेळी त्या पत्राचे गांभिर्य माहीत नव्हते मी सरळ ते पत्र माझ्या शाळेच्या दप्तरात टाकून घेऊन गेलो शाळेत ,अन पुन्हा घरी आपल्यावर मला माझ्या आई-बाबा ने खूप मारले अन दुसऱ्या दिवशी तुलाही त्यांनी रागावले.

तू कित्तेक कुटुंबाला माणसा माणसांना जोडून ठेवले होतेस रे पत्राच्या साह्याने, सुख दुःखाच्या वेळी तुझीच तर साथ होती सर्वांना , कोणाला नौकरी च्या आलेल्या पत्राची पोहोच, तर कोणाला लग्नाची पत्रिका, कोणाला दुःखाची बातमी, तर कोणाला गोड बातमी तुझ्याच मुळे मिळायची,

तुला खरंच सांगतो आजच्या या whatsaap, facebook आणि मोबाईल च्या जमान्यात कोणत्याही गोष्टीचे महत्व राहीले नाही, दुःख याचं वाटतं की,

“संपर्क जास्त झाला अन मनं दुरावली गेली”

पूर्वी कसं होतं बघ ना…! बाहेर शिकायला नौकरी ला गेलेल्या मुलाचं, मुलीचं पत्र आलं म्हणलं की वाचायच्या अधिच त्या आई च्या बहिणीच्या डोळ्यात पाणी यायचं रे….!, ते पत्र वाचताना घरातले सर्वजण अगदी घोळका करून बसायचे, सोबत तू ही असायचास अगदी कुटुंबातील सदस्या सारखा तेंव्हा व्यक्तिगत खाजगी असं काहीच नसायचं तुझ्या समोर, तुलाही सर्वांच्या घरात काय चाललंय हे तंतोतंत माहीत असायचं , पण तू त्या गोष्टीचा गैरफायदा कधीच नाही घेतला तुझ्या मनातही तसे पातक नाही आले,

कधी कधी असेच एखादे पत्र तू घेऊन आल्यावर घरातील एखादा खोडकर लहान मुलगा ते पत्र घेऊन सैरावैरा धावायचा त्याच्या मागे घरातील सर्व अन तू देखील धवायचास, घरात आनंद धिंगाणा मस्ती असायची गेले रे ते दिवस…..!

अन नाहीतर आज…! सकाळी घरातून निघालेला मुलगा रात्री परदेशात पोहोचतो अन लगेच मोबाईल द्वारे संपर्क करतो, चांगलं ही आहे अन थोडं वाईटही वाटतं, वाईट याच्या साठी की खोटे पणा जरा जास्तच वाढला आत्ताच्या काळात पूर्वी तसं नव्हतं, याची खंत वाटते…

खूप काही बोलावं वाटतं तुझ्याशी , अनंत उपकार आहेत तुझे सर्वांवर , खूप आठवणी सुद्धा आहेत टपाल, पोस्टमन काका आणि तुमच्या त्या संघटनेवर….!

तुझाच

#संतोष_करमाळकर

बीड

— संतोष करमाळकर

Santosh R Karmalkar

लेखाची लिंंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4112905212059196/

प्रोफाईल लिंक: https://www.facebook.com/santosh.karmalkar? 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*