नम्रता संकपाळ (कोल्हापूर)

महाचर्चा साहित्यिक कोण? मुळात साहित्यिक म्हणजे कोण? नवनवीन लिखाण करणारे लेखक व त्यांच्या ठराविक वाचक वर्गाला पडलेला अतिशय जिव्हाळाचा प्रश्न.नवलिखाण करणाऱ्यांना साहित्यिक म्हणता येईल का???खर तर साहित्यिक होण्यासाठी अनेक पुस्तकांचे लेखन करणे अनेक पुरस्कार मिळवणे हीच खरी पावती का साहित्यिक म्हणवण्याची?नवोदित लेखकांची साहित्यिक असण्याची ही खरी संभ्रमावस्था दिसून येतेय. साहित्य म्हणजे काय हो खरतर आपल्याला आलेले सुंदर अनुभव,आपले विचार,आपल्या भावना यांचे उत्स्फुर्तपणे मांडलेले सादरीकरण होय नाही का??कोणत्याही नव लेखकाला त्याने केलेल्या लिखाणाची पोचपावती म्हणून त्याच्या कामाचा कौतुक सोहळा व्हावा आपले लिखाण आपले विचार इतरांपर्यंत पोहोचावेत हीच माफक अपेक्षा असते.साहित्यिक कधी जन्माला येतो ज्यावेळी त्याचे विचार इतरांपर्यंत पोहचतील त्याच्या लिखानाचा सन्मान होईल हाच खरा तर गौरव असतो त्याच्या सृजनशीलतेचा.त्याची नवनिर्माण क्षमता कधी उफाळून येईल ज्यावेळी त्याच्या शब्दांना कौतुकाची झालर चढवली जाईल.आम्ही साहित्यिक ग्रुप हा खरं तर नवनिर्मिती व सृजनशीलतेचे माहेरघर होय जिथे अनेक कविता,कथा,अनेकांचे स्वानुभव या सगळ्यांचेच मिश्रण असते आणि तेही विविध विषयातून अतिशय सुंदरपणे मांडलेले असते.आपल्या विचाराना एक व्यासपीठ मिळन व लोकांकडून त्याचा गौरव होणं याहून तो दुसरा कुठला मोठा पुरस्कार.त्यामुळं नवोदित लेखकाला साहित्यिक म्हणणं खर तर सार्थ ठरेल.

— नम्रता संकपाळ, कोल्हापूर.
Namrata Sankpal

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*