अलका देशमुख

दोन दिवस विचारच केला आज आत्ता लिहायला सुरुवात केलीय…मला एवढं ज्ञान नाही पण तरीही माझ्या मनात वाटलं मला सुचलं तसं लिहण्याचा प्रयत्न केला आहे….!
साहित्य म्हणजे काय नेमकं अपेक्षित आहे हे जस कळलं तसं लिहण्याचा हा प्रयास केला मी.
प्रत्येकालाआवडणारं मनातून वाचलं जाईल अस वाचनीय.. अजून उत्सुकता वाढवणारअसं गूढ किंवा मनोरंजन करणार मनाला आवडणारं रुचणार सोबतच पचणारे अवास्तव ही नको अतिशयोक्ती नको वास्तवाला धरून शुद्ध शब्द भाषा आणि क्लिष्टता टाळून लिहलेलं साहीत्य आता त्यातही भरपूर प्रकार येतील..
कथा कादंबऱ्या ललित आत्मचरित्र व्यक्तिचित्रण प्रवास वर्णन काव्य कवितासंग्रह गझल्स अनेक भाषा अनेक प्रकार आणि वेगवेगळी लेखन शैलीअसे अनेकानेक प्रकार समाविष्ठ होतील
आपणआपल्या बालपणापासून घरांत ऐकतो तेपौराणिक वाङ्मय रामायण महाभारत ,सगळे सहा शास्त्र अठरापूरण, चार वेद कालिदासकृत मेघदूतअजरामर काव्य मोरोपंतांनी लिहलेल्या काव्य कथा रुक्मिणी स्वयंवर सारख्या ऐतिहासीक कादंबऱ्या शिवाजी सावंत कौंतेय कर्ण युगंधर किती नाव सगळेच नाही इकडे देऊ शकत पण ऐतिहासिक पौराणिक शृंगारिक गूढ रहस्यमय काळा पहाड सारख्या शेरलॉक होम्स यातही प्रत्येक भाषेतील साहित्य अजूनही भरपूर हे केवळ उदाहरणार्थ दिलंय..तर हे पौराणिक साहित्य त्या नंतर अनेक जेष्ठ साहित्यिक होऊन गेलेत कितीतरी मोठा अनमोल ठेवा ठेवून गेलेत आपल्या साठी ते वाचून अभ्यासून आपल्याला जी अंतरातून स्फूर्ती येते काहीतरी सुचतं लिहावं व्यक्त व्हावं अस वाटतं ते लिखाण आपल्या आतून येतं हातून होतं हे हिंदी इंग्रजी आणि इतरही अनेक भाषांमधून आपल्या साहित्यात उपलब्ध आहे.
आपण निरंतर वाचनातून आपल्यालाही आतून काही स्फुरलं लिहता आलं तर उत्तमच पण त्या साहित्याला या सर्व दिग्गज साहित्यिकांच्या सारखे सर्व निकष लागू आहेत का..?
आणि या लेखनाने आपण साहित्यिक झालोत का..साहित्याचा केवढा मोठा पसाराअवाका अमर्याद आहे किंवा जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राजवळ तरी आपण जाऊन पोहचतो का..?आजकाल सोशल मीडियामुळे हे नवकवींच कथालेखकांच जे पेव फुटलय ना ते सर्व काय साहित्यिक झालेत का..सगळेच कवी आणि लेखक बनले तर वाचकवर्ग कोण राहील..?पूर्वी अनेक विद्याव्यासंगी लोक होते पूर्वीचे मोठमोठे लेखक जे आपणही अभ्यासलेत ते खरे साहित्यिक भाषा ज्ञान असलेले आपण धड शुद्धलेखन ठीक लिहत नाही एक कथा लिहलीकिंवा कविता गझल लिहतांना त्यात हजार चुका निघतात ह्याला साहित्य म्हणावे का…?
सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला एखादाच विद्याव्यासंगी ज्याला भाषा खरंच पकळली तोच व्यवस्थित चांगलं म्हणण्यासारखं पोक्त भारदस्त लिखाण करू शकतो त्यात कथा कादंबरी काव्य कविता गझल्स निबंध सगळं सगळं समाविष्ट असेल… मी पण माझ्या मनातलं काहीबाही लिहते आता शिकत वृत्तबद्ध लिखाण कसं होईल हेही बघते म्हणून मी कवी गझलकार आहे का नाही हे केवळ आपल्या मनाचे खेळ आहेत ते बनायला भरपूर ज्ञान तळमळ आणि कसोटी लागते आपल्याजवळ तर थोडासा धीरही नाही लगेच दोनचार ओळी खरडल्या पोस्टल्या की शंभर वेळा किती लाईक्स आले ते बघणार अजून कसे येतील हे बघणार ओढून ताणून आपल्या तुटपुंज्या साहित्याचा बाजार प्रदर्शन मांडणार प्रसिद्धीची हाव किती असते हे दाखवून देणार आपोआप प्रसिद्धी मिळेल तेच खरे साहित्य लोकांनी शोधून आवर्जून वाचायला मागण्या करणे हे साहित्य अजूनही युगंधर मृत्युंजय शिवाजी महाराजांचा इतिहास ,बाजीराव मस्तानी किंवा शाहू महाराजांवरची कादंबरी किंवा गुलजार हरिवंशराय बच्चन यांच्या कविता गालिब ,जिगर यांची शेरोशायरी अगदी तुटून पडतात लोक वाचणारे हे खरं साहित्य आणि तेच खरे साहित्यिक
असंही नाही की आजकाल साहित्यिक नवीन जन्मतच नाहीत जे खरे साहित्यिक आहेत ते खरंच तळमळीने लिहतायेत ते आजही आणि त्यांच्या साहित्याने ते प्रसिद्धही होत आहेत अजून पुढेही आपल्यातूनच काही महान साहित्यिक जन्म घेतील म्हणजे उदयास येतील ही आशा आहे हे कधीच संपत नाही अव्याहत चालणारे चक्र आहे हे आणि ते असंच फिरत राहील साहित्य क्षेत्रातले नवे तारे अजूनही जन्माला येतील आणि त्यांच्या साहित्याने जगाच्या साहित्यक्षेत्रात नवीन क्रांती घडवून आणतील हीच आंतरिक ईच्छा ..आणि आशा…!!
अजूनही भरपूर लिहता येईल पण वेळ आणि शब्दमर्यादा आहेच…!!!
धन्यवाद…!
मनःपूर्वक आभार..!!
मी माझ्या अल्पबुद्धीने चार शब्दांत माझं मत लिहलय पण ते बरोबर आज की चूक हे नाही माहीत तरीही पोस्ट करते अवडल्यास जरूर सांगा पण जर चुकले तर नक्कीच सांगा…आभार…!!

— अलका देशमुख, अमरावती
Alka Deshmukh

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*