मराठी पुस्तकांतील निवडक उतारे..

राम गबाले (आमचे अण्णा)

ग. दि. माडगूळकरांवर समस्त मराठी रसिकवृंदानं अमाप प्रेम केलं. गद्य वा पद्य असो, त्यांच्या लेखनात मानवी जीवनाचा, संवेदनांचा मागोवा घेतलेला दिसतो. विचारवंत साहित्यिक पु. भा. भावे यांच्या शब्दात सांगायचं तर ‘‘वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही […]

व्यंकटेश माडगुळकर (शाळा)

खिळ्याला अडकविलेली पाटी, कोनाड्यांत पाने विस्कळीत होऊन पडलेले पुस्तक आणि पेन्सिल हे सारे साहित्य गोळा करून तिने मुलाच्या हाती दिले. ते घेतांना त्याचे चिखलाने भरलेले हात तिच्या दृष्टीला पडले आणि कपाळाला आठ्या घालून ती म्हणाली, […]

वि. वा. शिरवाडकर

एखाद्या निर्जन बेटावर जाताना एकच काव्य बरोबर नेण्याचे जर माझ्यावर बंधन घालण्यात आले तर मी ‘मेघदूत’ या काव्याचीच निवड करीन असे मला वाटते. मेघदूतापेक्षा अधिक श्रेष्ठ दर्जाची काव्ये जागतिक वाङ्मयात उपलब्ध नसतील असे अर्थात मला […]

निळू दामले (इंडोनेशिया स्त्रिया लोकशाही)

एका मॉलसमोर मला उतरवण्यात आलं. मी विचारलं किती पैसे द्यायचे. कंडक्टर काय बोलला ते मला कळलं नाही. शेवटी त्यानं माझ्याकडून ३० हजार रूपये घेतले. ३० हजार इंडोनेशियन रूपये. मी ते दिले. कुठल्याही शहरात पहिलं पाऊल […]

निळू दामले (इंडोनेशिया, स्त्रिया, लोकशाही)

एका भारतीय माणसाच्या घरी गेलो होतो. सहज. तासभर मी तिथं असेन. मी भारतीय आहे म्हटल्यावर त्यानं एक व्याख्यान झोडलं. आपला देश, आपली परंपरा वगैरेबद्दल गळाभर बोलला. पण तो त्याच्या बायकोवर इतका खेकसत होता की विचारू […]

प्रतिभा रानडे (अफगाण डायरी)

एक आश्चर्य म्हणजे इथल्या बाजारातले बहुसंख्य दुकानदार सरदारजीच आहेत. त्यांच्याकडून बरीच माहिती कळली. रणजितसिहानं जेव्हा काबूलवर स्वारी केली होती तेव्हापासून कितीतरी सरदारजी इथे आलेत. रणजितसिग तर नंतर माघारी गेला, पण त्याच्याबरोबर आलेले शेकडो शीख लोक […]

निळू दामले (इंडोनेशिया स्त्रिया लोकशाही)

उतरल्यावर मी पायी पायी हिडायला सुरूवात केली. हिडताना होतलान नावाचा एक तरूण विद्यार्थी मला पुस्तकाच्या दुकानात भेटला. त्याला इंग्रजी येत होतं. त्याच्याशी दोस्ती झाली. बराच काळ तो माझ्याबरोबर हिडत होता. त्याला केरिंची-पेकन बारू प्रवासाबद्दलची माहिती […]

प्रबोधनकार ठाकरे (वास्तवतेच्या चष्म्यातून आचार्य अत्रे)

आयुष्याचा प्रवास संपवून मनुष्याने एकसष्टीच्या उंबरठ्यावर उभे राहणे, ही एक क्रांतिकारक अवस्था असते. याच वेळी जीवनाला एक विशेष स्थिरता आलेली असते. अर्धशतकापूर्वीच्या मानसिक दास्यातच जन्मलेल्या नि जगणार्‍या पिढीनेच ‘‘साठी बुद्धी नाठी’’ हा प्रवाद चलनी केला […]

प्रभाकर पेंढारकर (रारंग ढांग)

आपल्या जन्मापासून मृत्यू हा आपला सोबती. पण त्याचा विचार करायला मुंबईसारख्या शहरात आपल्याला सवड असतेच कुठं ? आपण वृद्ध झाल्याखेरीज तो आपल्या आसपासही फिरकणार नाही अशी आपण आपली एक सोयिस्कर गैरसमजूत करून घेतलेली असते. पण […]

चि. वि. जोशी (माझे दत्त्तक वडील)

आता स्वतःची फजिती त्या बाईपुढे काय सांगावयाची ? त्या म्हातार्याची झडती घेऊन तुमची भांडी परत करतो असे सांगून मी निघालो. संध्याकाळच्या बोटीने रत्नागिरी बंदर सोडले. काय पाजी माणसाने मला बनविले ! आता कसली इस्टेट – […]

1 19 20 21 22 23