चि. वि. जोशी (माझे दत्त्तक वडील)

आता स्वतःची फजिती त्या बाईपुढे काय सांगावयाची ? त्या म्हातार्याची झडती घेऊन तुमची भांडी परत करतो असे सांगून मी निघालो. संध्याकाळच्या बोटीने रत्नागिरी बंदर सोडले. काय पाजी माणसाने मला बनविले ! आता कसली इस्टेट – पण चारपाचशे रुपयांच्या उधार्या मात्र करून बसलो होतो ! मी माझ्या मित्रांत उपहासविषय होणार ! पुण्यात घरात पाऊल टाकताच त्या थेरड्याच्या बत्तिशीपैकी शिल्लक राहिलेले दात न पाडीन तर नावाचा चिमणराव विठ्ठलच नाही.

— चि. वि. जोशी (माझे दत्त्तक वडील)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.