मराठी पुस्तकांतील निवडक उतारे..

पु. ल. देशपांडे (बटाट्याची चाळ)

आता आपले आडनावच घे. आपले आडनाव ‘सोमण’ हे कसे आले असेल ? शब्दांचा उगम आणि विकास पाहणे आवश्यक आहे.निरनिराळे शब्द कसे आले असतील ? अनेक भाषांतून आपण शब्द उसने घेतो. आणि मग ते आपले म्हणून […]

पु. ल. देशपांडे (असा मी असामी)

आता अशा ह्या गोंधळात निभवायचं मोठं कठीण असतं. थोडक्यात म्हणजे मुलं सैरावैरा, फूटपाथवरच्या दुकानांच्या आसपास रेंगाळत जाणारी पुत्रवत्सला आणि तिकीट हरवायला आणि चेकर यायला गाठ पडल्यावर होणारा चेहरा घेऊन चाललेला पुरुष असा मेळा गिरगाव-ठाकूरद्वारच्या भागात […]

केशवकुमार (झेंडूची फुले)

अंतःकरणाच्या अमर्यादित आवारांत बेहद्द ब्रह्मानंदाची बादशाही बदफैली म्हणजेच मायेच्या मोहक मृगजळाची आत्यंतिक उत्कटता ! विश्वरूपी भगवंताच्या साक्षात्काराच्या प्रेमळ प्रचीतीतून प्रादुर्भूत झालेले प्रेम हे संसारसोपानाच्या शेवटच्या पायरीवरील उंबरठ्यावर उभारलेल्या दयेच्या देवळाचा कांचनी कळसच ! प्रेमाचा द्वेष, […]

पु. ल. देशपांडे (असा मी असामी)

‘विडी’ हा एक मला छळणारा ज्वलंत प्रश्न आहे. माझ्या जीवनातले अनेक धागे जोडले गेले आणि तोडलेही गेले. एके काळी कुशाभाऊशी माझं सूत होतं. पण त्याला प्रमोशन मिळाल्यावर त्याच्या वृत्तीत बदल पडला. त्यामुळं आमचं सूत तुटलं. […]

अरुण साधू (ग्लानिर्भवति भारत…)

‘एक तर तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसानं असा मठ्ठ प्रश्न विचारू नये. बुद्धिभ्रम झाल्याचं हे लक्षण आहे. कारण असं आहे की आपण ही सिस्टिमच अशी निर्माण केली आहे की, मध्यवर्गीय माणसाला नुसत्या सर्व्हायव्हलसाठी देखील अनेक ढोंगं करावी […]

न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी (सूर्योदयाची वाट पाहूया…)

‘ईहलोकात राहून ज्याची लॉयल्टी, श्रद्धा, बांधिलकी परलोकाशीस असेल त्यांनी शक्य तितक्या लवकर परलोकात गेले पाहिजे. त्यासाठी त्यास इतरांनी मदत केली पाहिजे.’ याच पारलौकिक वृत्तीमुळे हिदूंचे तेहतीस कोटी देव, ते कमी पडले म्हणून साधू, संत व […]

व. पु. काळे

‘‘हो, आम्ही त्यांचे दुखणारे गुडघे का घेतले ? चार दिवसांकरिता घेतलेत. काळे, आम्ही असा विचार नाही करत. अहो एवढा मोठा कलावंत आहे, समाजाचं मनोरंजन करतो. तो कोणत्या समाजाचं मनोरंजन करतो ह्यावर काय अवलंबून आहे ? […]

मधु मंगेश कर्णिक (माहीमची खाडी)

‘‘हे बघ, काशीराम ! तू काय हवें तें कर…पण आज मारलंस तसं बायकोला पुन्ना कधी मारूं नकोस. ती एक दिवस मरून जायल…नाय मारलंस तरी ती आतां फार दिवस जगणार नाय… तुझ्या पोटी माझ्या आब्बाससारखा पोरगा […]

पु. ल. देशपांडे (बटाट्याची चाळ)

‘‘सामुदायिक जलभरण दिसतंय-’’ बाबूकाकांच्या बोलण्यात कोकणी खवटपणा होता. ‘‘हो ! आमच्या चाळीत पाणी भरण्याचे काम पुरुषवर्गाकडे आहे !’’ ‘‘छान !’’ कल्पलताबाई उद्गारल्या, ‘‘पण तुम्ही सामुदायिक शिवण ठेवले नाही का ?’’ स्वतःच्या विषयाकडे वळत त्या म्हणाल्या. […]

पु. ल. देशपांडे (बटाट्याची चाळ)

‘‘बटाट्याचं ठीक आहे; पण पंत, आधी भात सोडा !’’ एक सल्ला. ‘‘भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं ? आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहेत लठ्ठ ? तुम्ही डाळी सोडा !’’-काशीनाथ नाडकर्णी. ‘‘मुख्य म्हणजे साखर सोडा […]

1 20 21 22 23