साने गुरुजी (श्यामची आई)

एका शनिवारी मी असाच घरी जावयास निघालो. त्या दिवशी मी जरा खिन्न व दुःखी होतो. जणू मला जगात कोणी नाही, असे त्या दिवशी वाटत होते. माझ्या ठिकाणी लहानपणापासूनच ही वृत्ती आहे. कधी कधी एकदम मनात येते की, खरोखर कोण आहे आपल्याला या जगात ? हा विचार मनात येऊन अनेकदा मी रडलो आहे. काही कारण नसावे व एकदम डोळे भरून यावेत हृदय सद्गदित व्हावे, असे अनुभव मला आले आहेत. मी जणू एक बिदू ! कोणाचे झाडाचे पान ! क्षणात वाळून जाणार, पडून जाणार !

– साने गुरुजी (श्यामची आई)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.