सिसिलिया कार्व्हालो (जादूचा ‘वार’)

एके दिवशी मैत्रिणीने मला ‘वार’ दाखवायला नेले…ती म्हणाली..‘तू काही विकत घेऊ नकोस पण बघ तर खरं.’ मीही फक्त बाजार बघण्यासाठी म्हणून फेरफटका मारण्याचे ठरवले..अगदी पक्का विचार करून की..मला काहीच विकत घ्यायचे नाहीय…
जयवंत दळवी ‘लास वेगास’ला प्रथमच गेले तेव्हाचा एक प्रसंग ‘लोक आणि लौकिक’ या प्रवासवर्णनपर लेखसंग्रहात वाचलेला आठवला…‘लास वेगास’ जुगारासाठी प्रसिद्ध असलेले शहर…जुगार खेळायचा नाही असे मनाशी ठरवून ते गेले…पण मग एखादा सेंट घालवायला काय हरकत आहे असे त्यांना वाटले…म्हणता म्हणता त्यांनी डॉलरही घालवला..मग गेलेले सेंट आणि डॉलर्स मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा खेळावेसे वाटते…
तशी माझी स्थिती त्या वारात झाली..एकेक वस्तु बघता बघता..अंगात वारे संचरले…सगळ्या वस्तू सुंदर दिसू लागल्या. भासू लागल्या..
अशी काय जादू आहे वारात की आपल्याला सौंदर्य दृष्टी प्राप्त होते…क्षुल्लक गष्टही उपयोगाची वाटू लागते….स्वस्त वस्तू मस्त वाटू लागतात…अस्ताव्यस्त पसरलेल्या बाजारातही सुंदरतेचा शोध लागतो…..

– सिसिलिया कार्व्हालो (जादूचा ‘वार’)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.