कमलाबाई टिळक (शांती)

एक वर्षांपूर्वी बाल्ययौवनाच्या ऐन सीमेवर थिजून गेलेल्या निरुत्साही शांतीची आजची ती गडबड ऐकून मला जरा आश्चर्यच वाटले. हातपाय धुऊन शांतीच्या खोलीत पाय ठेवताच, शांतीला पाहून ते द्विगुणीत झाले. शांतीचा बाळंतिणीचा वेष काही मोठा मनात भरण्याजोगा होता, असे नाही. जुने विटके लुगडे, डोक्यावरून घेतलेला बावळटसा पदर, लांब बाह्यांचे मळके पोलके, पायात रंग गेलेले तेलकट मोजे व त्यावर घातलेला जुना मेणचट जोडा – या वेषात अप्सरासुद्धा हबशिणीसारखी दिसायची. पण शांतीच्या तोंडावर अशी काही टवटवी, डोळ्यात अशी काही आनंदाची मजेदार चमक व अंगोपांगी उत्साहाची अशी काही लवलव सळसळत होती की पूर्वीची शांती ती हीच का असा मला क्षणभर भ्रम झाला व वस्तुस्थितीची ओळख पटताच परमावधीचे; आश्चर्य व समाधान वाटले
– कमलाबाई टिळक (शांती)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.