शंकर वैद्य (कुसुमाग्रज प्रवासी पक्षी)

कुसुमाग्रजांच्या लेखनात येणार्‍या शब्दाची किमया हा एक वेगळाच भाग आहे. वारकरी नेत्र, जिराईत अक्षरे, मेघशील जीवन, सूर्यद्रोही जंगल, निरांजनी नजर ही विशेषणे वाचली की कवीची सौंदर्यदृष्टी अर्थाचे पैलू कसे घडवते याची कल्पना येते. तेजाची ‘गहन एकता’ त्यांना दिसते. ‘लावण्याचा शुभ्र ताटवा’ दिसतो, उसासा ‘वादळतेने धुमसत जाताना जाणवतो’, ‘वाहती खग सांजवेळी’ असे पक्षी जाणवतात, आणि उपरोधासाठी ‘तबेला-लावण्याचे उमाळे’ असा समास त्यांना करता येतो. अशा शब्दसंपत्तीच्या आधारे फुललेल्या त्यांच्या कविता आहेत.

– शंकर वैद्य (कुसुमाग्रज प्रवासी पक्षी)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.