विश्वास सावरकर (आठवणी अंगाराच्या)

आर्थिक गणन – मग ते सार्वजनिक असो किंवा वैयक्तिक – ते वेळच्या वेळी व चोख ठेवलेले तात्यांना हवे असे. त्यामध्ये एखादी किरकोळ वाटणारी गोष्ट सोडलेली त्यांना चालत नसे. रत्नागिरीत असताना हिदुसभेचे सार्वजनिक गणन ते स्वतः ठेवीत. त्यात साध्या कार्यालयातील केरसुणीचा आठ-बारा आण्यांचा व्ययही ते लिहीत असत. मागल्या वर्षाची आणे-पैशातली शिल्लकही पुढील वर्षीच्या गणनात आय करण्यास तात्या विसरत नसत. वैयक्तिक गणनही ते पाहत. त्यात एकदा एक रुपया भेट मिळालेला मी ‘आय’ मध्ये (जमा केलेला) घेतल्याचे पाहून तात्यांनी समाधान व्यक्त केले होते.

— विश्वास सावरकर (आठवणी अंगाराच्या)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.