मोहनदास करमचंद गांधी (सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा)

आम्ही मुंबईहून निघालो तेव्हा प्लेग चालूच होता. त्यामुळे आम्हाला विटाळात पडण्याची थोडीबहूत भीती होतीच. बंदरात नांगर टाकल्यावर प्रथम बोटीला पिवळा बावटा उभारावा लागतो. डॉक्टरची तपासणी आटोपल्यानंतर डॉक्टर मोकळीक देईल, तेव्हा पिवळा बावटा उतरवितात. मगच उतारूंच्या आप्तेष्टांना वगैरे आगबोटीवर येण्याची परवानगी मिळते. शिरस्त्याप्रमाणे आमच्या बोटीवरही पिवळा बावटा फडकला. डॉक्टर आले. तपासणी करून पाच दिवसांचा विटाळ पाडण्यात आला. कारण की प्लेगचे जंतू तेवीस दिवसांपर्यंत परिणाम करू शकतात, अशी त्यांची समजूत होती; आणि म्हणून यांनी मुंबई सोडल्यापासून तेवीस दिवसांपर्यंत आगबोटींना विटाळात बसविण्याचे ठरविले. पण या विटाळाच्या हुकुमांतील हेतू आरोग्य एवढाच नव्हता. आम्हाला माघारे घालविण्याची चळवळ डरबनमधील गोर्‍या नागरिकांनी चालविली होती. हेही या हुकुमाचे एक कारण होते.

— मोहनदास करमचंद गांधी (सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.