दुर्गा भागवत

आश्विनात जातो जातो म्हणून हुलकावणी दाखविणारी अभ्रे अजूनही आकाशात वेळी अवेळी येतात. अभ्रे दाटली की ती आकाशाला खाली ओढतात; पण आता ढगांचे पांढरे पुंजके खांद्यावर घेऊनच जणू काही आकाश वर उंच उभे असल्यासारखे वाटते. खोडकर पोरे पायाला झोंबली की, वत्सलतेने मोठी माणसे त्यांना वर उचलून घेतात, तशीच ढगांच्या भाराने वाकणारी, पावसाळ्यात त्यांच्याच तंत्राने अहर्निश चालणारी आकाशदेवी-ती अदिती-आता हसत हसत त्यांना आपल्या काबूत ठेवत आहे. पळवून लावते आहे. आणि ढगही उजळ हसरी तोंडे करूनच हुलकावण्या देत पळून जाताहेत.

— दुर्गा भागवत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.