य. गो. जोशी. (एक रुपया दोन आणे)

कादंबरी-नाटकात, नायक-नायिकेची पहिली प्रेमाची नजरानजर होताच दोन्ही जीव नाटक-कादंबरीच्या अंतापर्यंतचा धांगडधिगा, विरह-करूण वगैरे रसांची पुटे वजा जाता, जन्माचे सोबती होतात ! त्याप्रमाणे आमची जन्माची सोबत जरी ठरून गेली होती, तरी एकमेकांच्या जन्मांच्या सोबतीची दोन माणसे, एकमेकांची पुरती व मनमोकळी ओळख झालेली नसल्यामुळे, अद्याप आम्ही एकमेकांचे अनोळखी सोबती होतो. सुमारे अर्धा अधिक तास असा गेला की, तो कसा गेला हे आम्हाला कळलेच नाही ! मंत्रमुग्ध अशी आमची हृदये आपापल्या शरीरांचा बोजा सांभाळून काहीतरी करीत होती.

— य. गो. जोशी. (एक रुपया दोन आणे)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.