मारुती चितमपल्ली (शब्दांचं धन)

कार्तिक महिन्याचे ते दिवस. वर निरभ्र आकाशात आकाशगंगेच्या उजळ प्रकाशात बगळ्यांच्या रांगा उडतांनाच सुंदर दृश्य दिसायचं. भक्तगण गात गात गंगेवर कार्तिक स्नानाला जाऊ लागलेले असत. आम्ही घरी न परतता ती भजनं ऐकत घाटावर जात असू. ती जागा फार सुंदर आहे. विस्तीर्ण घाट आहेत. तिथून खाली नदीचं विशाल पात्र दिसे. गुलाबी थंडीला नुकतीच सुरुवात झालेली असे. नदीच्या पात्रावर लाटा उठत. नक्षत्रांचं सुंदर प्रतिबिब पाहता पाहता आकाशगंगेत उडणार्‍या बगळ्यांच्या रांगा नदीतीरावर उतरू लागत.

— मारुती चितमपल्ली (शब्दांचं धन)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.