नसीमा हुरजूक (चाकाची खुर्ची)

काल रात्रीपासून मनावर प्रचंड ताण पडला होता. लहानपणापासून आम्हाला कोणी ‘गरीब’ म्हटलेलं मला सहन होत नसे आणि ‘गरीब’ म्हणून हे माझा जो अपमान करत होते, तो सहनशक्तीच्या पलीकडे होता. माझ्या मनाचा बांध फुटला. भल्या मोठ्या हॉलमध्ये ओळखीचं, नात्याचं कोणी जवळ नव्हतं. पैसे आहेत का, या प्रश्नाला मानेनं होकारार्थी उत्तर देऊन, दोन्ही हातात तोंड लपवून मी रडत होते. कळत नव्हतं, मी तोंड लपवण्यासारखं काय चुकीचं वागले ? या व्यक्तीला या खुर्चीवर कोणी बसवलं ? शिक्षण ही काय पैसेवाल्यांची मक्तेदारी आहे ? माझ्याकडे पैसा नसता, तर माझी ही अतिशय बुद्धिमान बहिण परीक्षा देऊ शकली नसती !

— नसीमा हुरजूक (चाकाची खुर्ची)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.