एक गरीब विधवा बाई आपल्या एकुलत्या एक मुलाबरोबर राहात होती. गरिबी असूनही ती आपल्या मुलाचे सुरेशचे सर्व लाड पुरवित असे. एकदा सुरेशने आईजवळ ढोल घेऊन देण्याचा हट्ट केला. तिने जंगलात जाऊन झाडाचा एक ओंडका कापून सुरेशला दिला. सुरेश बाहेर पडला तेव्हा समोरच्या झोपडीत एक म्हातारी चूल पेटवत होती. लाकडं ओली असल्यामुळे धुराने तिचे डोळे लाल झाले होते. सुरेशला ते पाहवले नाही. त्याने तो ओंडका म्हातारीला दिला. म्हातारीने त्या बदल्यात त्याला भाकरी दिली. पुढे एक मूल आपल्या आईजवळ भाकरीसाठी रडत होते ते पाहून सुरेशने आपल्या जवळची भाकरी त्याला दिली. त्याच्या आईने सुरेशला एक वाडगे दिले. ते घेऊन सुरेश पुढे गेला. तेव्हा एका घरात वाडगे फुटले म्हणून नवरा-बायको भांडत होते. सुरेशने त्यांना आपल्या जवळचे वाडगे दिले. त्यांनी सुरेशला घोंगडी दिली. पुढे थंडीने कुडकुडणारा एक माणूस त्याला दिसला. सुरेशने त्याला घोंगडी दिली. त्याबदल्यात त्या माणसाने सुरेशला आपला घोडा दिला. वाटेत एक लग्न सोहळा सुरू होता. लग्न घोड्याशिवाय आडले होते. सुरेशने आपल्याजवळचा घोडा देऊन टाकला. घोड्याच्या मोबदल्यात काय हवे ? अशी विचारणा होताच वरातीतील बॅन्डवाल्याकडे पाहून सुरेशने त्याच्या हातातील ढोल मागितला. बॅन्डवाल्यानी त्याला आपला ढोल दिला. ज्या ढोलासाठी तो आईजवळ हट्ट करत होता तो ढोल शेवटी अशा रीतीने त्याला मिळाला. ::
तात्पर्य – भगवान के घर देर है लेकिन अंधेर नही ।
Leave a Reply