संस्कारावर आधारलेल्या वृत्तीप्रमाणे दृष्टी निर्माण होत असते

एकदा ब्रह्मदेवाकडे उपदेश घेण्यासाठी देव, दानव आणि मानव तिघेही गेले. तिघांची परीक्षा बघण्यासाठी ब्रह्मदेवाने तिघांनाही ‘द’ हे अक्षर उपदेश म्हणून दिले आणि काही दिवसांनी परत येण्यास सांगितले. थोड्या दिवसांनी तिघेही परतले. तेव्हा ब्रह्मदेवाने विचारल्यावर प्रत्येकजण आपापली बाजू सांगू लागला.
देवाने सांगितले, ‘‘आम्ही देवलोक सदैव भोगात गुंतलेलो. तेव्हा हे ब्रह्मदेव आमच्यातील या षड्रिपूंचे ‘द’ अक्षराने दहन करा.’’
राक्षस म्हणाले,‘‘आम्ही वाईट वृत्तीचे क्रोधी आहोत तेव्हा ‘द’ अक्षराने आम्हाला दया करावी.’’
मानव म्हणाले, ‘‘संचयाच्या मागे लागलेले आम्ही लोभी आहोत तेव्हा आम्हाला ‘द’ अक्षराने दान करा.’’
ब्रह्मदेवाने प्रत्येकाला ‘द’ अक्षर दिले. तरीही प्रत्येकाने कारण मात्र आपापल्या अनुभवातून सांगितले.
तात्पर्य – संस्कारावर आधारलेल्या वृत्तीप्रमाणे दृष्टी निर्माण होत असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.