पु. भा. भावे (मुक्ती)

…भूखंडासारखा एक भूखंड ! केवळ एक क्षण ! आणि त्याचाही एक अंश ! त्याचे अशाश्वत रूप, अशाश्वत अस्तित्व ! त्याने मला कुंठित करून ठेविले होते-अगदी इथेही ! जे इतके नगण्य , इतके नश्वर, इतके मर्यादित व इतके नाशिवंत आहे, त्याने ! होय, होय अखेर ती भावना, ती कल्पना, ती विशालताही मर्यादितच आहे ! येथून पाहिल्यावर, येथे आल्यावर, विश्वाच्या मानदंडाने मोजल्यावर ! तो प्रकाश प्रकाश नव्हता, ते प्रेम प्रेम नव्हते, ते ज्ञान ज्ञान नव्हते, ते सौंदर्य सुंदर नव्हते, ती शाश्वतता स्थिर नव्हती ! आणि तेजस्वरूपाची, ज्ञानस्वरूपाची, सौंदर्यस्वरूपाची, शांतिस्वरूपाची दिशा धरून उड्डाणशील झालेल्या मला त्या मोहतंतूनी येथेही अवरुद्ध केले काय ?… पाशाची जाणीव जीवात्म्याला झाली व पाश तुटले ! पुनश्च मोक्षाचे दार उघडले ! जाणीव-जाणीव ! अंतिमाची जाणीव ! व अनंताशी एकतानता, विश्वात्म्याची सरूपता ! सायुज्य !… मोक्ष…मुक्ती !

— पु. भा. भावे (मुक्ती)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.