अती लोभ हा घातकच ठरतो

मिलिद एकदा आपल्या बाबांबरोबर प्राणीसंग्रह पहायला गेला होता. पिजर्‍यातील एक एक प्राणी पहाता पहाता ते माकडांच्या पिजर्‍यासमोर आले. मिलिदने चौकसपणे विचारले, ‘‘बाबा माकडांना जाळ्यात पकडून पिजर्‍यात टाकतात का ?’’ त्याच्या या प्रश्नावर त्यांना एक गोष्ट आठवली. ते म्हणाले, ‘‘अरे, माकडांना पकडायची परंपरेने चालत आलेली फार जुनी पद्धत आहे. एका पेटीत शेंगदाणे ठेवून ती पेटी झाडाला उंचावर बांधतात आणि त्या पेटीला एक लहानसे छिद्र पाडतात. दाण्याच्या लोभानी माकडं त्या पेटीजवळ येतात. पेटीचे छिद्र पाहून दाणे घेण्यासाठी त्या छिद्रातून हात पेटीत घालून शेंगदाणे हातात घेतात. शेंगदाणे हातात घेतल्यावर आपोआप मूठ आवळली जाते. मात्र आवळलेल्या मुठीसकट हात त्या पेटीच्या छिद्रातून त्याला बाहेर काढता येत नाही पण लोभामुळे हातातले शेंगदाणे सुद्धा त्याला सोडवत नाहीत. त्यामुळे माकड बराच वेळ पेटीजवळ अडकून पडते आणि त्याला पकडणे शक्य होते. खरं तर मुठीतील शेंगदाणे सोडून दिले तर क्षणात त्याचा हात त्या छिद्राबाहेर येऊन पळून जाता आले असते पण त्याचा शेंगदाण्याचा लोभ सुटत नाही त्यामुळे ते सापळ्यात अडकते. मनुष्यप्राणीही कधी कधी अतिलोभापायी स्वतःचे नुकसान करून घेतो. ःः
तात्पर्य – अती लोभ हा घातकच ठरतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.