रावण म्हणजे केवळ खलनायक की एक थोर विद्वान राजा? रामायणातील राक्षसांचा राजा म्हणून ओळखला जाणारा रावण हा पराक्रमी, वेदपंडित, कट्टर शिवभक्त आणि महान शासक होता—असा वेगळा दृष्टिकोन मांडणारी कादंबरी म्हणजे “रावण : राजा राक्षसांचा”. या भागात लेखक व उद्योजक शरद तांडळे यांच्याशी झालेल्या सखोल संवादातून आपण जाणून घेतो— पुराणकथा, साहित्य आणि कलेत रावणाला दुर्गुणी का ठरवण्यात आलं? रावणसंहिता, कुमारतंत्र, सामवेदातील ऋचा, शिवतांडव स्तोत्र, वीणा व बुद्धिबळ यांसारख्या निर्मितींशी जोडल्या गेलेल्या या असामान्य बुद्धिमत्तेच्या पुरुषाला इतिहासाने खलनायक का केलं? सर्व देवांना पराभूत करणारा, विविध दैत्य-दानव व भटक्या जमातींना स्थैर्य व समृद्धी देणारा आणि सोन्याची लंका घडवणारा हा महान राजा—त्याच्या मनाचा वेध घेणारी ही चर्चा म्हणजे एक विचारप्रवर्तक प्रवास.
Host: Dhanashree Pradhan Damle
0:00 – Highlights
1:29 – Marathisrushti Talks Logo
1:32 – Disclaimer
1:35 – Introduction
2:29 – रावण ला खलनायक म्हणूनच का दाखवले जाते? आणि या खलनायकावर कादंबरी का लिहिली गेली?
6:25 – रावण कादंबरी लिहिताना कोणकोणत्या गोष्टींचा आधार घेतला?
10:35 – विमान प्रवासात सुचलेली कल्पना नेमकी काय होती?
12:51 – रावण कादंबरीतील वेगवेगळ्या पात्रांची ओळख आणि त्यांची वंशावळी शोधायला किती वर्षे लागली?
20:46 – विभीषण ने रावण ला धोका दिला, हे शेवटी उघडकीस येते की सुरुवातीपासूनच संकेत मिळतात?
21:30 – सोन्याची लंका निर्माण करण्यामागची नियोजन प्रक्रिया कशी होती?
25:19 – हिंदू धर्मामध्ये पंचकुलीन स्त्रियांना दिलेले स्थान आणि मान
29:30 – सीतेला श्रीलंकेत कसे आणले गेले?
32:25 – लंका निर्मितीनंतर रावण चा आयुर्वेदाकडे वळण्याचा प्रवास
35:41 – नारद मुनी यांच्या भेटीचा उल्लेख आणि त्याचे महत्त्व
36:40 – रावण संहिता / राक्षस संहिता म्हणजे नेमकं काय?
38:51 – लंका दहनानंतर कादंबरी तिथेच संपते का? कादंबरीचा शेवट कसा होतो?
45:35 – दहा तोंड असलेला रावण – ही दहा तोंडं नेमकी काय दर्शवतात?
49:48 – कादंबरी लिहिण्याआधीचा रावण आणि कादंबरीनंतरचा रावण – फरक जाणवतो का?
54:46 – End

Leave a Reply