अयोध्या म्हणजे केवळ प्रभू श्रीरामांची जन्मभूमी नाही – तर हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास, संस्कृती आणि परंपरा जपणारी एक प्राचीन नगरी आहे.
या विशेष भागात मराठीसृष्टी टॉक्स च्या host धनश्री प्रधान दामले यांच्यासोबत ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि भाजपचे माजी प्रवक्ते माधव भांडारी अयोध्येच्या इतिहासाचा वेध घेत आहेत. श्रीरामांच्या जन्मापूर्वी अयोध्या कशी होती.
मनुनिर्मित नगरी म्हणून अयोध्येचा उल्लेख नेमका काय सांगतो? वेद , रामायण , जैन आणि बौद्ध परंपरांमध्ये अयोध्येचे स्थान काय होते? गौतम बुद्धांचा अयोध्येची काय संबंध होता? चीनी प्रवासी आणि इतर परदेशी प्रवाशांनी अयोध्येबद्दल काय नोंदवून ठेवले? आणि हजारो वर्षांच्या इतिहासात अयोध्येचे महत्त्व नेमके कसे बदलत गेले?
माधव भांडारी यांच्या “कधीही पराभूत न झालेली नगरी – अयोध्या” या पुस्तकाच्या संदर्भातून या भागात अयोध्येच्या इतिहासाचा एक वेगळा आणि अभ्यासपूर्ण प्रवास घडतो.

Leave a Reply