डाॅ. सोनाली उमेश गायकवाड

साहित्य या शब्दाची शब्दशहा व्याख्या करायला गेलो तर जे, जे काही आपल्याला लिहिता येईल ते सगळं साहित्य असं म्हणता येतं. भावना, प्रसंग, व्यक्तिचित्र व्यक्त करण्यासाठी किंवा साकारण्यासाठी वापरलेले शब्द म्हणजे साहित्य . पण साहित्यिक म्हटलं की प्रामुख्याने जी नावे डोळ्यासमोर येतात ती म्हणजे पु. ल देशपांडे, ग. दि माडगूळकर, प्र.के अत्रे, वि. स.खांडेकर व. पु. काळे, अमृता प्रीतम, गुलजार पासून तर शेक्सपियर कालिदास ही ,आणि अशी बरीच नाव डोळ्यासमोर येतात. त्यांचे लिखाण अप्रतिम आहे आणि त्यांनी समाजात तसा नावलौकिकही मिळवलेला आहे.

पण एक दिवस आम्ही साहित्यिक ग्रुप दिसला आणि त्यात काय आहे म्हणून उत्सुकतेपोटी तो ग्रुप जॉईन केल्यानंतर त्यातील अनोळखी ज्यांची नावे ही आपल्याला माहिती नाही अशा सदस्यांचे छोटे-मोठे लेख वाचून छान वाटायचं. अगदी दोन ओळीचा शेर असू दे, चारोळी असू दे, किंवा लांबलचक पानभर कविता असू दे. नाहीतर कुठल्याही विषयावर असलेला लेख असू दे , व्यक्तिचित्रण, प्रसंग असू दे किंवा भावनिक गुंतवणूक असु दे, तो ज्या शब्दांमध्ये मांडला जातो त्या शब्दांमध्ये जर वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद असेल तर ते साहित्य दर्जेदार असे म्हणता येईल. प्रत्येक मनामध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये एक साहित्यिक लपलेला असतो. शब्दांची भावनिक सांगड घालून वाचकाच्या मनाचा ठाव घेऊन त्याला आपलंस करून घेतो, तो खरा साहित्यिक. लेखणीच्या माध्यमातून जो मनात उतरून, दाद मिळवतो तो खरा साहित्यिक असतो. ज्याला लिहिण्याची कला अवगत आहे असा प्रत्येक व्यक्ती साहित्यिक. हं मग तो मोठा किंवा छोटा असा असू शकतो आणि त्याचे मोठेपण किंवा लहानपण हे त्याने किती आणि काय लिहिलेले यापेक्षा लोकांना त्याचं लिखाण कितपत आवडलं यावरून ठरणार असत.
साहित्यिक वेगवेगळ्याा प्रकारचे असू शकतं. प्रत्येक साहित्यिकाचाा आपला असा एक वाचक वर्ग असतो साहित्यिकाचे लहान-मोठे पण हे त्याचा वाचकवर्ग किती आहे यावरून ठरवता येऊ शकतं.

© डाॅ. सोनाली उमेश गायकवाड
Dr. Sonali Umesh Gaikwad

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*