परवीन कौसर (Parveen Kausar)

पत्र म्हटले कि आठवतात ते पहिले दिवस. त्यावेळी पत्र म्हणजे एकमेकांची सुख दुःख कळविण्याचे अथवा समजण्याचे साधन. पत्राचे महत्त्व एका माहेरवाशिणी पेक्षा दुसरे कोणी सांगू शकेल का?

मी लिहिलेल्या पत्रात पहिलें लिहीलेले पत्र आमच्या आजी आजोबांना. आठवतं मला त्यावेळी मी चौथीत शिकत होते. आणि आमच्या बाबांची बदली मराठवाड्यातील परळी वैजनाथ या गावी झाली होती. आम्ही जाऊन सुखरूप पोहोचलो यासाठी आई लिहीत होती त्या पत्राच्या शेवटी मी माझ्या तोडक्या अक्षरात लिहिलेले होते.

खरंच पत्रामध्ये एक वेगळीच आपुलकी होती.पोष्टमनाच्यां सायकलीचीं बेल वाजली कि अरे आले वाटते पत्र असे आवर्जून घरांत बोलले जात.

त्यानंतर माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे माझी दहावी. मला चांगले गुण मिळाले आणि शाळेत सत्कार केला. हे सांगण्यासाठी मी माझ्या प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक श्री. वि. गो. कुलकर्णी सर यांना लिहिलेले होते. मला अ आ इ ईचे धडे त्यांनीच शिकवले होते.

तशीच लग्नानंतर माहेरी पत्रे लिहिली होती.परंतु त्यामध्ये एक अत्यंत खास आठवणं ‌म्हणजे जेव्हा मी नवीन लग्न करून सासरी आले होते.जेमतेम महिनाच झाला असेल.एके दिवशी माझे सासरे दुपारी नमाजपठण करून आले.आणि मला बोलावले.आणि माझ्या हाती आंतरदेशीय कार्ड दिले आणि म्हटले”अरे बेटा अम्मी अब्बू को तुम्हारी खैरियत समझाने के लिए ख़त नहीं लिखा तुमने। लो ऐ लिख दो मैं जाकर पोस्ट कर दूंगा’

खरंच त्यावेळी मी अक्षरशः रडकुंडीला आलें.

अशा खुप सार्या आठवणीं आहेत पत्रे हद्दपार झाली.राहिल्या त्या आठवणी.मी शेवटचे लिहलेले पत्र म्हणजे माझ्या सासरे यांना.त्यावेळी मी माहेरी होते आणि काही कारणास्तव मला आणखी काही दिवस राहायला हवे होते म्हणुन.आणि नंतर त्याचे उत्तर म्हणून मला पाठविलेले शेवटचे पत्र माझ्या सासरेंनीं कि तु इकडची काळजी करू नकोस.तु तुझी तब्येत सांभाळून रहा.आराम कर.आणि हो कधी येणार आहेस तू ते कळवं म्हणजे मी येईन नेण्यास तुला.बेटा तु नाहीस तर घर मुकेच झाले आहे.लवकर बरी हो.आम्ही वाट पाहतो आहोत.
तर अशी ही आपुलकीची पत्रे.जी पत्राची़ वाट पाहण्यास लावणारी.हाती मिळताच मजकूर वाचण्यासाठी होणारी एक वेगळीच तगमग.सारे कसे अगदीच मनाला आनंद देणारे.
तर अशी ही पत्रे आनंदात सहभागी दुःखात सहभागी.एक आपल्या जीवनातील भागच होता जणु.खंत वाटते आता ते हद्दपार झाले बद्दल.

–परवीन कौसर

Parveen Kausar

लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4111113868904997/

प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/parveen.kausar.902?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*