सागर बाणदार

खरा साहित्यिक कोण ?
कविता, चारोळी किंवा अन्य लिखाणातून दररोजच्या जगण्यात आलेले अनुभव,मनातली सल आपल्या परिने उलगडत राहतो…आणि ते काही अंशी खरंही आहे… कारण आपल्या मनातील भावनांचे शब्द हे अनुभवाच्या कसोटीवर उतरुनच ते साहित्यातून साकारलेले असतात… त्यामुळे या व्यवहारी जगात कसं जगायचं आणि पैशाला किती महत्व द्यायचं, याचंही शहाणपण आपल्याला या अनुभवातून येत राहतं…जे आपल्याला ख-या अर्थाने जगायला शिकवतं…निव्वळ विचारानं कधीच पोट भरत नाही… हे अगदी मान्य,पण विचारांशिवाय चांगलं जगणं तरी शक्य आहे का इथं कुणाला…?विचारांचा आवाका हे आपलं शक्तीस्थळ असतं,जे विपरित परिस्थितीतही संकटातून मार्ग काढत स्वतः मधील मानसिक, शारीरिक क्षमतांचे अस्तित्व अधोरेखित करत राहतं…अन् ख-या अर्थानं श्रीमंत करत आनंदानं जगायला शिकवतं…म्हणूनच ज्या विचारांमुळे आपली अंगभूत कला विकसित होईल, अशा गोष्टींना पोषक वातावरण निर्माण करुन देतानाच मनातील विचारांची परिपक्वता वाढत राहिल,यासाठीच आग्रही राहिलं पाहिजे… वास्तवाला भिडून भविष्याचे स्वप्न पाहून
कविता किंवा कोणतंही साहित्य लिहून कुटूंबाचं पोट भरणार नसलं तरीही त्यातून निर्माण होणारे विचारांचे सामर्थ्यच आपल्या जगण्याला सुरेख आकार देत जीवन सार्थकी लावण्यात नक्कीच मदत करत राहिल,हिच मनाची पक्की खूणगाठ आहे….

— सागर बाणदार, इचलकरंजी
Sagar Bandar, Ichalkaranji

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*