कंबोडिया ते कॅनडा

Combodia Te Canada

पुस्तकाचे नाव : कंबोडिया ते कॅनडा – सफर आगळ्या वेगळ्या देशांची
लेखक : सौ. पुष्पा चिं. जोशी
किंमत : रु. १७५
पाने : १४८
प्रकाशक : सौ. पुष्पा जोशी
वर्गवारी : प्रवासवर्णन

 

पुस्तक येथेच ऑनलाईन खरेदी करा


पुस्तकाचा संक्षिप्त परिचय लेखिकेच्या मनोगतातून 

मध्यंतरी असे वाचनात आले की, व्हिएतनामचे एक राजकीय शिष्टमंडळ भारत भेटीवर आले होते. त्यावेळी त्या मंडळाने छत्रपती शिवरायांच्या रायगडाला आवर्जुन भेट दिली. व्हिएतनामने शिवाजीराजांसारखे गनिमी काव्याने लढून अमेरिकेसारख्या बलाढ्य शत्रूला नामोहरम केले. शिवरायांना गुरुस्थानी मानणारा व्हिएतनाम प्रत्यक्ष बघता आला. कंबोडियामध्ये भारतीय संस्कृतीची नाममुद्रा रामायण-महाभारतातील अद्वितीय शिल्पांमधून उमटली आहे ती पाहता आली. छोटासा पण वैशिष्ट्यपूर्ण भूतान अनुभवता आला. लालसर पांढऱ्या अफाट वाळूमधील जॉर्डन आणि इस्लामी राष्ट्रांच्या गराड्यात स्वकर्तृत्वाने, सन्मानाने उभा असणारा जिद्दी इस्त्रायलही पाहिला.

ज्ञान संपन्न, कलासंपन्न, प्राचीन संस्कृतीचा वारसा असणारे ग्रीस आणि त्याजवळील सुशांत बल्गेरिया बघण्याचा योग आला. इतिहासातील कलापूर्ण वारसा जपून वैज्ञानिक क्षेत्रात भरारी घेणारा, कम्युनिस्ट विचारांचा प्रणेता असलेल्या अवाढव्य रशियाचा थोडासा पण महत्त्वाचा भाग बघता आला. पूर्व आफ्रिकेच्या घनदाट जंगलातील समृद्ध प्राणीजीवन, व ‘व्हिक्टोरिया फॅाल्स’ चे अनाघ्रात सौंदर्य अनुभवले.

स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को येथील कलावारसा, सौंदर्य, आणि वेगळपणा लक्षात राहील असाच आहे.

उत्तर अमेरिका खंडामधील स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या कॅनडाचे मनसोक्त दर्शन घेतले.

या साऱ्या आगळ्या वेगळ्या देशांचे शब्दचित्र दर्शन या पुस्तकातून वाचकांना घडविले आहे. माझ्या या आधीच्या ‘देशोदेशींचे नभांगण’, ‘चला आसामपासून अंदमानपर्यंत’ शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘सफर अलिबागची’ आणि ‘निसर्गरम्य सातारा’ तसेच नुकतेच प्रसिध्द झालेले ‘ओंजळीतली चांदणफुले’ हा ललित लेखांचा संग्रह या पुस्तकांचे वाचकांनी उत्तम स्वागत केले. तसेच हे आगळे-वेगळे देशही वाचकांना आवडतील असा विश्वास वाटतो.

– सौ. पुष्पा जोशी


लेखकाचा संपर्क  :

 सौ. पुष्पा चिं. जोशी
12/13 पुष्पकुंज सोसायटी
नटवर नगर रोड नं 3, जोगेश्वरी पूर्व
मुंबई 400060

फोन – 28230442
मोबाईल – 9987151890


पुस्तक येथेच ऑनलाईन खरेदी करा


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*