J-009-2

चार पोरांचे लटांबर घेऊन त्या बाई बसमध्ये चढल्या. आत शिरताच पोरट्यांनी असा काही उच्छाद मांडला की, सारे प्रवासी वैतागलेच. अखेर त्राग्याने बस कंडक्टर म्हणाला, “बाई, पुढल्या खेपेस अर्धी पोरं घरी ठेवून या !” यावर नाक उडवून त्या म्हणाल्या, “म्हणजे काय? आलेच मुळी !”