J-551

“अरे, इतकी उधळपट्टी, इतकी चैन करणं चांगलं नाही. पैसे जपून वापरावेत. माझे वडील मला चार आणे देत ते मी महिनाभर पुरवित असे आणि तुला रोज चारशे रुपये लागतात ? तुला काहीच कसे वाटत नाही?” गण्याचे वडील त्याला समजावून सांगत होते. “ हे पहा बाबा, एकेकाचे नशीब असते. माझा बाप दरिद्री नाही हे माझे नशीब. त्याला मी काय करणार?” गण्याने शांतपणे उत्तर दिले.