J-552

“लग्नापूर्वी तुम्ही काय काम करीत होता?” “मी याच घरात घरकाम कारीत होते.” मालिनीबाईंनी सांगितले. “अरे वा नशीब काढलंत. ज्या घरात नोकरी केली त्या घराच्या तुम्ही मालकीण झालात की!” “नशीब कसलं, तेव्हा कामाचे पैसे तरी मिळायचे आता फुकट राबावं लागतंय.” मालिनीबाईंनी आपले दु:ख व्यक्त केले.