J-536

रेल्वेतून बॅग घेऊन प्लॅटफॉर्मवर उतरताच समोर नवरा दिसला पण त्याचा पडलेला चेहरा पाहून रश्मी त्याला म्हणाली, “काय हा तुमचा चेहरा? ते समोरचे सद्गृहस्थ पाहा आपल्या बायकोशी किती प्रेमाने बोलत आहेत, नाहीतर तुम्ही ! पडलेल्या चेहर्‍याने मला घ्यायला आलात.”
“अगं पण ते त्यांच्या बायकोला सोडायला आले आहेत, घ्यायला नाही !”