बसमध्ये बसायला जागा नव्हती पण एक पहिलवान माणूस बस ड्रायव्हरच्या शेजारीच येऊन बसला. ड्रायव्हरने एका थांब्यावर बस थांबवून ड्रायव्हर खाली उतरला. नंतर पुन्हा बस सुरु करताना बसचा गिअर दिसेना. तो इकडे तिकडे पाहू लागल्यावर पहिलवान म्हणाला,”बस सुरु झाल्यापासून मी पाहात होतो, इतक्या वेळ मागेपुढे करीत होतात पण तो दांडा काही तुमच्याच्याने निघत नव्हता तेव्हा मीच तो दांडा उखडून फेकला.”