J-033

इयत्ता चौथीची तोंडी परीक्षा सुरू असते. वर्गशिक्षक एकेका मुलाला प्रश्न विचारत असतात, “काय रे, उभयचर प्राणी म्हणजे काय ?”
मुलगा उत्तर देतो, “जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहणारा प्राणी.” पुढच्याला मुलाला विचारतात, “जलचर म्हणजे काय ?”
दुसरा मुलगा सांगतो, “पाण्यात राहणारे प्राणी.” पण तिसऱया मुलाला प्रश्न विचारायच्या आधीच मुलगा उठून उभा राहतो आणि विचारतो, “सर, टीचर म्हणजे चहात राहणारा प्राणी का ?”