J-034

एकदा एक इंजिनियर झालेला तरुण इंटरह्यूला कंपनीत जातो.
साहेब तरुणाला विचारतात, “ तुला पगाराची काय अपेक्षा आहे ?”
तरुण ः “एक लाख पगार, गाडी, बंगला आणि दोन-तीन नोकर.”
साहेब ः “ठीक आहे, आम्ही दीड लाख पगार, एक बंगला, एक गाडी आणि पाच-सहा नोकर देऊ.”
तरुण ः “काय साहेब थट्टा करता का ?”
साहेब ः “मग सुरुवात कोणी केली ?”