J-032

गोविंदरावांच्या बायकोचे निधन झाल्यावर तिचे एक छान चित्र काढून घरात लावावे म्हणून त्यांनी एका उत्तम चित्रकाराला पाचारण केले. चित्रकार म्हणाला, “साहेब काळजी करू नका. तुमच्या प्रिय पत्नीचे अगदी बोलके चित्र काढून देतो.”
“नको रे बाबा. न बोलणारी बायको आयुष्यात प्रथमच पहायला मिळावी म्हणून तर मला चित्र काढून हवे आहे !” गोविंदराव वैतागून म्हणतात.