J-031

पर्यटकांचा मार्गदर्शक डोंगरावरच्या एका पॉईन्टची माहिती सांगताना म्हणाला, “तो पलीकडचा पॉईन्ट सर्वात उंचावर आहे. पण वाट अवघड आहे. वेडीवाकडी वळणं आहेत आणि सर्वात म्हणजे थोडा जरी पाय घसरला तर खोल दरीत पडून मरण्याची भीती आहे. पण काळजी घेऊनही पाय घसरला तर उजवीकडची वृक्षराजी, नयनरम्य वृक्षलता पहायला विसरू नका कारण ती पुन्हा कधी दिसणार नाही ! ;