जी. ए. कुलकर्णी (राधी)

काळे घरात आले, आणि तेव्हापासून गल्लीत चेटकाचे प्रकार फारच वाढले. एकदा गल्लीच्या कोपर्‍यावर लिंबू व कुंकू घातलेला भात दिसला. काळ्यांच्या अंगणातील डाळिबाचे झाड पाहतापाहता वाळून गेले. त्याच्या आदल्या दिवशीच राधी काळ्याला घेऊन तेथे गेली होती आणि त्याने त्याला झाडाला अंग घासले होते. रमाकाकूंनी राधीने दिलेला कढीलिब घेतला आणि त्यांची गाय आटून बसली. भागीरथीबाईंचा रहाट गडगडा मोडून नव्या घागरीसकट पाण्यात पडला. बाळंतपणासाठी आलेल्या गौरीचे मूल तर सातव्या महिन्यातच गेले. आता राधी रस्त्याने चालू लागली की बायका सरळ बाहेर येऊन तिला शिव्या देऊ लागत.

– जी. ए. कुलकर्णी (राधी)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.