स्वा. वि. दा. सावरकर

‘‘डोळ्यांत तेल घालून आपल्या राष्ट*मातेच्या प्रगतीवर जागरूक लक्ष ठेवा. इतके कार्य झाले किवा इतका प्रयत्न केला या मोजमापावर प्रगतीचे मूल्य ठरवू नका; तर आपल्या लोकांनी किती क्लेश सोसले नि किती आत्मत्याग ते सतत करू शकले या कसोटीवर त्या प्रगतीचे मूल्यमापन करायला शिका. कारण कार्यनिष्पत्ती हा योगायोग आहे; परंतु आत्मत्याग हा नियम आहे. आत्मत्यागाच्या खंबीर पायावरच अभिनव नि अतिभव्य राज्यांची विभवमंदिरे उभी राहतात. हुतात्म्यांच्या रक्षेत रूजलेले राज्यवृक्षच विस्तीर्ण वाढतात, विभवसंपन्न होतात. ईश्वराने दिलेला प्राण त्याच्या चरणी पुन्हा अर्पण करीपर्यंत नि ईश्वरी कार्याची परिपूर्तता होईपर्यंत अशा अभिनिवेशाने कार्य करीत रहा की एकतर हुतात्म्याची पुष्पमाला तरी मस्तकावर मिरवाल किवा विजयाचा तेजोमुकुट तरी जिंकून घ्याल ! येतो ! प्रिय सुहृदांनो ! माझा हा अखेरचा प्रणाम स्वीकारा !’’

— स्वा. वि. दा. सावरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.