संकटाच्या वेळी मदतीला येतो तोच खरा मित्र

जीवन आणि राजीव दोघं अतिशय व्रात्य मुलं पण एकमेकांचे जिवलग मित्र. काहीतरी विचित्र कल्पना सदैव त्यांच्या डोक्यात शिजत असत. आज दोघांनी मिळून जंगलात फिरायला जायचे ठरविले. हसत खेळत जंगलात फिरत असताना राजीवच्या पायाला ठेच लागली. पाय दुखल्यामुळे त्याला भराभर चालता येईना ! त्यामुळे जंगलातून बाहेर पडायला उशीर होत होता. तेवढ्यात त्यांना समोरून एक कोल्हा येताना दिसला. दोघे ही अतिशय घाबरले. जीवन कोल्ह्याला पाहून पळत सुटला; तो थेट एका उंच झाडावर चढून बसला. राजीवच्या पायाला लागल्यामुळे त्याला पळता येत नव्हतं. त्याने मग एक युक्ती योजली. तो पटकन जमिनीवर आडवा झाला आणि त्याने श्वासोच्छवास रोखून धरला. कोल्हा राजीवच्या जवळ आला. त्याच्या कानाजवळ कोल्ह्याने त्याला हुंगले. पण तो मेला आहे असे समजून कोल्हा तेथून निघून गेला. कोल्हा गेल्याचे पाहून जीवन झाडावरून उतरून राजीवजवळ आला. जीवनने राजीवला विचारले, ”कोल्ह्याने तुझ्या कानात मघाशी काय सांगितले ?” त्यावर राजीव म्हणाला, ”मला कोल्ह्याने सांगितलं, ”संकटाच्या वेळेस जो मित्र पळून जातो त्याच्याबरोबर कधीही मैत्री करू नको.”
तात्पर्य – संकटाच्या वेळी मदतीला येतो तोच खरा मित्र.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.