श्रीराम लागू (लमाण)

गिधाडांचे आवाज ध्वनिमुद्रित करण्यासाठी विनोद दोशी आणि अमोल पालेकरांनी काय काय लटपटी-खटपटी केल्या ते त्यांचे त्यांना ठाऊक! माझी बाकीची नाटके (‘इथे ओशाळला मृत्यू’, गुरुमहाराज गुरू’, ‘काचेचा चंद्र’ इत्यादी) सांभाळून मी तालीम घेत होतो. आणि एक दिवस सेन्सॉर बोर्डाकडून नाटक परत आले. नाटक पास केले होते-पण त्यातील सुमारे दीडशे आक्षेपार्ह शब्द गाळायला सांगितले होते ! रूढार्थाने शिव्या नाटकात खूपच होत्या. (‘भ’ची सबंध बाराखडी !) पण ती गिधाडांची बोलीभाषा होती.-सुसंस्कृत माणसांची नव्हती. त्यांनी त्याच भाषेत बोलायला हवे होते. नागरी, सभ्य भाषेत बोलली असती, तर ती गिधाडे वाटली नसती.

– श्रीराम लागू (लमाण)