विनोबा भावे

गीतेच्या दुसर्‍या अध्यायात स्थितप्रज्ञाच्या लक्षणाचे जे श्लोक आहेत त्यात एक श्लोक असा आहे की, ‘‘योगी म्हणजे परमेश्वराचा भक्त, दुसरे लोक जेव्हा झोपून असतात तेव्हा तो जागत असतो आणि दुसरे लोक जेव्हा जागत असतात तेव्हा तो झोपून असतो.’’ हे वाक्य कालदर्शक नसून अवस्था-दर्शक आहे. लोक फलप्राप्ती आदि ज्या विषयात जागृत राहतात त्या विषयात योगी निश्चिंत राहतो.

– विनोबा भावे