अॅन्टन चेकॉफ (शरमेची गोष्ट)

गाडीवान पाहुणा निघून गेल्यानंतर पेलागेया बाहेरच्या दालनात आली आणि साफसुफी करू लागली. तिच्या मनाचा गोंधळ अजूनही संपला नव्हता. तिची चर्या लाल झाली होती, आणि ती घाबरल्यासारखी दिसत होती. ती केर काढू लागली, पण जमिनीला केरसुणीचा स्पर्श होत होता कुठं ? एकेका कोपर्‍यात ती पाच पाच मिनिटं उगीचच रेंगाळत होती. ज्या खोलीत मालकीणबाई बसल्या होत्या तिथं ती किती तरी वेळ घोटाळली. मनातले विचार मनात ठेवणं तिला कठीण झालं होतं; आणि अंतःकरण उघड करण्यासाठी कुणाशी तरी बोलावं असं तिला वाटत होतं. मालकीणबाई संभाषण सुरू करतील म्हणून तिनं पुष्कळ वाट पाहिली, पण त्या काही बोलेनात. शेवटी ती मोठ्यांदा पुटपुटली, ‘‘गेली एकदांची ब्याद !’’

– अॅन्टन चेकॉफ (शरमेची गोष्ट)