अॅलेक पदमसी – अनु. आशा कर्दळे

खूप वर्षांपूर्वी मी उपनिषदांतल्या एका वचनाचं भाषांतर वाचलं होतं. ‘ज्याला प्रवासाचा आनंद वाटत नाही, तो कधीच मुक्कामाला पोचणार नाही.’ त्यातून मला जीवनाचा अर्थ स्पष्ट झाला. त्या वेळेपर्यंत माझ्या पाश्चिमात्य शिक्षणामुळे मी पूर्णपणे ध्येयाभिमुख झालो होतो. ध्येयाप्रत जाण्याचा मार्ग गौण मानत होतो. अवकाश अंतर्गत बंधांनी एकत्र जोडलेलं असतं, हे मी शिकलोच नव्हतो. माझ्या दृष्टीनं फक्त मर्यादित क्षेत्रात, कारण आणि परिणाम एवढंच महत्त्वाचं होतं. खाचेत नाणं घातलं की, चॉकलेटचं पाकीट बाहेर येतं, एवढंच माहीत. ते येताना मधल्या वाटेत काय काय होतं, त्याच्याशी मला फारसं कर्तव्य नव्हतं. आपण करत असलेल्या कामात आनंद वाटणं हे त्या कार्याच्या फळाइतकंच महत्त्वाचं असतं, याची जाणीव अखेर मला शाळेच्या क्रिकेट मैदानावर झाली.

– अॅलेक पदमसी – अनु. आशा कर्दळे