व. पु. काळे

कलावंताशी लग्न करताना कायम त्याच्याकडे कलावंत म्हणून पहायची इच्छा आणि शक्ती असेल तर करावं…
संसारात, व्यवहारात तो सामन्यापासून निराळा वागणार आहे हे गृहीत धरूनच करावं…
त्याचं वागणं विक्षिप्त वाटेल पण त्याच्या विश्वात त्याला , त्याची अशी संगती असेल… ते आकलन होणार असेल तरच करावं…
कलाकाराच्या सगळ्याच वृत्ती आणि विकार उत्कट असतात.
राग, प्रेम, लोभ, अभिलाषा, माया….या सगळ्याच संवेदना पराकोटीच्या प्रखर असतात आणि त्यातल्या त्यात कुठल्या संवेदना केव्हा उफाळून येतील याचे संकेतही सामान्य पेक्षा निराळे असतात..
अमुक एक भावना या वेळीच का ? असा प्रश्न त्या कलाकाराला रुचत नाही..
त्याला त्या क्षणी फक्त साथ हवी असते….

— व. पु. काळे

1 Comment on व. पु. काळे

Leave a Reply

Your email address will not be published.