विहिरीतल्या बेडकासारखेच स्वत:ला संकुचित करून आपण जगत असतो. त्याऐवजी दृष्टी विशाल ठेवून जगणे हे कधीही चांगले

एकदा पावसाळ्यात दोन बेडूक एकमेंकाला भेटले. त्यातील एक बेडूक एका विहिरीत राहणारा तर दुसरा बेडून समुद्रात राहणारा होता. पावसापाण्याच्या गप्पा झाल्यावर विहिरीतल्या बेडकाने उत्सुकतेने विचारले, ”समुद्र कसा असतो ?” तेव्हा समुद्रातल्या बेडकाने समुद्राची लांबी, रुंदी, खोली, त्यातील प्राणी, निरनिराळे मासे, वनस्पती इत्यादींचे महाप्रचंड प्रमाणातलं रसभरीत वर्णन त्याला ऐकवलं. परंतु डोळ्याने न पाहिल्यामुळे विहिरीतल्या बेडकाला समुद्राच्या विशालतेचा अंदाज येईना. तेव्हा विहिरीतल्या बेडकाने एक उडी मारून विचारले, ”मी एका उडीत जेवढे अंतर कापले तेवढा समुद्र असतो का ?” त्यावर दुसर्‍या बेडकाने ‘नाही’ असे उत्तर दिले. तेव्हा त्याने त्यापेक्षा आणखी मोठी उडी मारली आणि विचारले, ”एवढा मोठा असतो का ?” त्यावर समुद्रातल्या बेडकाने पुन्हा ‘नाही’ म्हटले. मग विहिरीतल्या बेडकाने बर्‍याच उड्या मारल्या आणि अपेक्षेने त्याच्याकडे पाहिले. तेव्हा समुद्रातला बेडूक म्हणाला, ”जन्मभर जरी अशा उड्या मारल्यास तरी समुद्राएवढे अंतर तुला दाखवता येणार नाही.” हे ऐकून विहिरीतला बेडूक रागावला. तो म्हणाला, ”तू मला फसवतोस आहे. कारण तू मला हे सगळं खोटंच सांगतो आहे. या विश्वात या विहिरीपेक्षा मोठं काहीच असू शकणार नाही. कारण मला मोजता येणार नाही एवढा समुद्र जगात अस्तित्वाच नसणार.”
तात्पर्य – विहिरीतल्या बेडकासारखेच स्वत:ला संकुचित करून आपण जगत असतो. त्याऐवजी दृष्टी विशाल ठेवून जगणे हे कधीही चांगले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.