प्रभाकर पेंढारकर (रारंग ढांग)

;;खाली फेसाळत वाहणारी सतलज. पाण्यात हत्तीसारखे उभे दोन पत्थर. पडलो तसं वाटलं, छातीतलं काळीज हललं. श्वास घशात अडकला. अभावितपणे डोळे गच्च मिटले गेले. दरदरून घाम फुटला असावा. बोटं ओली झाल्यानं गर्डरवरची पकड सुटत चालल्याचं लक्षात आलं. खाली सतलजचा रोरावता प्रवाह. त्या थंडगार पाण्याचा स्पर्श होण्यापूर्वीच अंगावर काटा उभा राहिला. डोकं सुन्न झालं. हातातली ताकद संपली. माझी पकड सुटली. एकच क्षण…पण त्या क्षणात ग्यानचंदचे शब्द कानी आले… ‘‘आदमी मर जाता है तो पीछे उसका क्या रहता है ?’’

— प्रभाकर पेंढारकर (रारंग ढांग)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.