पु. भा. भावे(मुक्ती)

… हिमालयाची गगनचुंबी शिखरे, उत्तुंगतेची स्पर्धा लावणारी. स्फटिकशुभ्र चकाकणारी. उत्तरेच्या द्वारातील धवलतेचे तोरण. गुलाबपाकळ्यांच्या पायघड्या. पक्व फलभार. फुलांचे खच. रसरसलेली, करवतलेली, हिरवीकंच पाने. नौकागृहांचे थवे. देवदार, शाल्मली! सिधूचा फुंसाडता प्रवाह ! अवखळ, उच्छृंखल, प्रचंड जीवनदायी ! … लवपुरी, पुरुषपुर, शिबी, श्रीनगर ! ओखला ! कालिदीच्या प्रवाहाची विस्तारलेली चादर ! डोहावर वाकून पाण्याशी खेळणार्‍या कदंबाच्या फांद्या ! दुग्धपानाने फेसाळलेले बालकांचे ओठ ! बंदुकीच्या कृष्णमुखातून उडालेली आग ! सीमेवर टाकलेले पर्णशून्य प्रस्तरांचे उग्र सैनिक !

— पु. भा. भावे(मुक्ती)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.