ज्ञान मिळविण्यासाठी वयाची मर्यादा नसते

स्वामी विवेकानंद एकदा बोटीतून प्रवास करत होते. ते फिरत फिरत त्या प्रवासी बोटीच्या डेकवर येऊन उभे राहिले. बाजूला पंचाहत्तरच्या जवळपास वय असलेले एक वृद्ध गृहस्थ खुर्चीत बसले होते. त्यांच्या हातात एक जाडजूड ग्रंथ होता. त्या ग्रंथाचे ते वाचन करीत होते. ते पाहून विवेकानंदांना आश्चर्य वाटले. त्यांनी त्या वृद्ध गृहस्थांना विचारले, ”तुमचं वय बरंच दिसतं आहे तेव्हा या वयात एवढे जाडजूड ग्रंथाचं वाचन तुम्ही कशासाठी करता? आता या वयात तुम्हाला त्याचा काय उपयोग ? त्यावर ते वृद्ध म्हणाले, ”तुमचं म्हणणं खरं आहे, पण या वयात मरण कधी येणार याची चिता करत बसणं माझ्या स्वभावात बसत नाही. आणि या पुस्तकातील ज्ञानाचा मला उपयोग विचाराल तर या वयात मला यातील ज्ञान जगाला शिकवता येणार नसलं तरी माझ्या निधनापूर्वी मला ग्रह, तार्‍यांचं रहस्य समजलं तरी खूप आनंद होईल. तेव्हा या वयात पुस्तक वाचणं म्हणजे आनंद मिळवणं आहे आणि मी तेच करतो आहे.
तात्पर्य – ज्ञान मिळविण्यासाठी वयाची मर्यादा नसते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.